Description
बोलूनचालून ही कालची स्वप्ने! सुंदर सुंदर कल्पनांची आणि कोमल कोमल भावनांची जी नाजूक पाखरे आपण मोठ्या चातुर्याने शोधून धरून आणली आहेत, असे त्या वेळी मला वाटत होते, ती आज आपल्यापाशी नाहीत; स्वैर उडत उडत ती फार दूर गेली आहेत, आपले शब्दांचे पिंजरे आता रिकामे झाले आहेत, याची जाणीव मला आज तीव्रतेने होत आहे. त्यांना धरून ठेवण्याच्या धडपडीत पिंजऱ्यात किंवा पिंजऱ्याच्या आसपास जी काही पिसे पडलेली असतील, त्यांच्यावरच यापुढे मला समाधान मानले पाहिजे. ही पिसे तरी माझ्यापाशी राहणार आहेत, की तीही वाऱ्यावर उडून जाणार आहेत, हे टीकाकारांचा टीकाकार जो काळ त्याच्याशिवाय दुसरे कोण सांगू शकेल?
Details
Author: v s khandekar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 124