पुस्तकाविषयी बोलताना लेखक विकास लवांडे सांगतात की , आपला सामान्य भारतीय नागरिक अद्याप समाजशास्त्र , नागरिकशास्त्र , राज्यशास्त्र यांपासून बराच दूर आहे. अनेक गोष्टी माहिती नसतात. सामाजिक ,राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील बहुतांश जण वैचारिकदृष्ट्या दिशाहीन असतात. त्यांना प्राथमिक स्वरूपाची विविध माहिती असेल तर ते त्याच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. मी कार्यकर्ता शिबिरे घेतली . विविध स्तरावरील व्यक्ती व कोणत्याही कार्यकर्त्यांची गरज ओळखून त्यांना उपयुक्त व साहाय्य होईल असे पुस्तक कुठेही उपलब्ध नाही . म्हणून मी माझ्या अनुभवाद्वारे हे पुस्तक आपल्या हाती देत आहे . हे पुस्तक नक्कीच सर्वांना उपयोगी होईल असा विश्वास वाटतो. या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देताना जेष्ठ नेते श्री. शरद पवार म्हणतात की , "सार्वजनिक जीवनात व्यक्तिमत्वाची मूस घडत असताना विविधांगी विषयांचा स्पर्श झाल्यास नेतृत्वाची घडीव मूर्ती तयार होते. सुदैवाने आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात विपुल ग्रंथभांडार आहे. या संदर्भग्रंथाची उंच चवड हाती घेण्यापूर्वी ' कर्ता करविता कार्यकर्ता ' सारख्या सुलभ पुस्तकाची पहिली पायरी चढून जाणे इष्ट आहे."
Author: Vikas Lawande | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 240