कासरगोड येथील हव्यक कुटुंबातली श्रुति नावाची एक तरुणी रहमत नावाने इस्लाममध्ये धर्मांतरित झाल्याचा बातमीने सर्वत्र खळबळ उडाली होती. श्रुति पदव्युत्तर शिक्षण घेऊन शिक्षिकेची नोकरी करत होती. देवाच्या कृपेने श्रुति / रहमतला 'आर्ष विद्या समाजम्' मध्ये येऊन सनातन धर्म शिकण्याचे भाग्य लाभले व त्यामुळे धर्मांतराचा मूर्खपणा तिच्या लक्षात आला. याचे परिमार्जन म्हणून तिने आता 'आर्ष विद्या समाजम्' सोबत पूर्णवेळ सनातन धर्माच्या प्रसारासाठी स्वयंसेविकेच्या रूपात काम करण्याचा संकल्प केला आहे. परिणामी हजारो लोकांना आपल्या स्वधर्मात (सनातन धर्म) परत आणण्यात तिला यश मिळाले. YouTube वरील तिच्या या संबंधित व्हिडिओना ५९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. धर्मांतरामागची खरी कारणे व त्याचे निराकरण या पुस्तकात विशद केले आहे. धर्मांतरामुळे आपल्या पालकांना सहन कराव्या लागलेल्या यातना व अपमानाचा सामना, इतर कोणत्याही पालकांना सहन करावा लागू नये ही श्रुतिची इच्छा आहे.
Author: O. Sruthi | Publisher: Bouddhikam Books and Publications | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 221