केशवराव जेधे (Keshavrao Jedhe)

By: Y D Phadke (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 300.00 Rs. 270.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार आणि छत्रपती शाहू महाराज यांचा बहुजनांच्या उद्धाराचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे आणि १९१९ ते १९५९ हा चाळीस वर्षांचा कालखंड आपल्या कार्यकर्तृत्वाने अक्षरशः गाजवणारे बहुजनांचे नेते देशभक्त केशवराव जेधे यांचे अत्यंत निःस्पृहपणे लिहिलेले हे जीवनचरित्र. या पुस्तकात केशवराव जेधे या लोकनेत्याची राजकीय-सामाजिक जडणघडण, ब्राह्मणेतर चळवळीतील त्यांचे नेतृत्व, पुरोगामी विचारांची त्यांनी धरलेली कास आणि त्यासाठी केलेला अविरत संघर्ष यांचे तर दर्शन घडतेच, शिवाय महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आणि शिवस्मारकासाठी केशवरावांनी सभागृहात उभे केलेले तंटेबखेडे; सामाजिक जीवनात उभी केलेली चळवळ आणि प्रस्थापित सनातनी नेतृत्वाला आव्हान देत बहुजनांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी दिलेला लढाही वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. शेतकरी-कष्टकरी वर्गासाठी केशवरावांनी केलेल्या संघटनकार्याचे आणि खेडोपाड्यात काँग्रेस पक्ष रुजवताना त्यांना घ्याव्या लागलेल्या कठोर मेहनतीचे चित्रही आपल्या समोर उभे राहते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्यता निवारण कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, महात्मा गांधींचे सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीसंग्राम अशा आत्यंतिक महत्त्वाच्या घटनांतील केशवरावांची मौलिक भूमिकाही स्पष्ट होते; तर ब्राह्मणेतर पक्ष ते काँग्रेस आणि काँग्रेस ते शेकाप मग पुन्हा काँग्रेस या केशवरावांच्या राजकीय प्रवासात आपणही सहभागी होतो. हे पुस्तक म्हणजे एका देशभक्ताच्या जीवन कार्याचा तटस्थपणे घेतलेला वेध आहे.

Details

Author: Y D Phadke | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: | No of Pages: 220