Description
'एक निसर्गरम्य खेडं.
तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा.
त्यानं पाळलेली खार.
समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा,
जनावरं, करामती मित्र यांत रमलेला,
गुंतलेला मुलगा.
एके दिवशी गावाच्या नदीवर
धरण बांधणा-या मशिनरीची घरघर,
थोड्याच दिंवसात
अख्खा गावगाडा हलतो.
नांदत्या वस्त्या उठतात.
मुलगा कुटुंबासह गाव सोडतो.
ती खार मात्र तिथंच राहते.
उमलत्या हळव्या वयातल्या
उलथापालथीची सहजपणे
सांगितलेली ‘खरी’ गोष्ट.
Details
Author: L. M. Kadu | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160