Description
विद्यागौरी खरे यांनी म्हटल्याप्रमाणे आपला समाज, आपले शेजारी ह्यांचा विचार करायला शिकवणारे हे पुस्तक एकमेकांपासून तुटत चाललेल्या आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या आपल्या समाजाकरता फार आवश्यक आहे. आपल्याच भाऊबंदांनी चालवलेल्या कृष्णवर्णीयांच्या शोषणाविरुध्द उभ्या ठाकलेल्या वकिलाची ही कहाणी असली तरी हा वकील एक आदर्श पालक आहे. आपल्या कृत्यांचे नैतिक परिणाम विशेषत: आपल्या मुलांवर काय होतील याचा विचार करुनच पुढे पाऊल टाकणारा तो एक जबाबदार व प्रगल्भ नागरिक आहे.
Details
Author: Harper lee | Publisher: Manovikas Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 246