'कुणा एकाची भ्रमणगाथा' हे गोपाल नीलकण्ठ दाण्डेकरांच्या आत्मानुभवाचं कलारूप, जीवनाची वैविध्यपूर्ण रूपं जितकी दाण्डेकरांना अनुभवता आली, तितकी अनुभवलेला मराठी लेखक विरळा. ही कादबरी आत्मप्रत्ययाच्या स्पर्शान रसरशीत झाली आहे नर्मदानदीची परिक्रमा करण्याच्या हेतून निघालेल्या एका संवेदनशील तरुणाच्या जीवनातला हा अनुभबोश आहे. दाण्डेकरांनी स्वतःच म्हटलं आहे. मी चित्तशुद्धीसाठी प्रवासास निघालेला यात्रिक. त्या प्रवासात आणि त्यापूर्वीच्या भटकंतीतही जीवनातल्या नाना रंगांचे अनुभव घेतलेला त्यातले विविध रंग भरून मी त्या कुणा एकाचें' चित्रण केले आहे भ्रमणगाथेत परीजीच्या प्रसंगाचा मी केवळ साक्षी आणि निवेदक होतो 'यशोदा' प्रकरण लिहिणे मात्र तितकेसे सोपे नव्हते. मीही मजकडून ते गुंतणे गुंतलो होतो माझ्या आजारपणामुळे मला तिच्या वडिलाच्या आश्रमात राहणे भाग पडले आणि त्यामधे तिची निरपेक्ष अतिथीसेवा . तिने दोघांच्याही भावनावर मात केली. हळुवारपणे दोघेही अपार स्नेहाच्या नात्यात गुंतत चाललो. गुंतणे कुणाच्याच पक्षाला लाभदायक नाही, हे माहीत असूनदेखील दोघांमध्ये एक अमिट, अकाट्य बंधन होते. तिने आणि निरुपायाने मीही ते बंधन जपले ओलांडले नाही. शेवटी आला ताटातूटीचा क्षण जिव्हारी भिडणारा, त्यालाही निर्धाराने सामोरा गेलो ही उत्कट कथा मी 'कुणा एकाची भ्रमणगाथा' लिहून शब्दबद्ध केली आहे
Author: Gopal Nilkanth Dandekar | Publisher: Mrunmai Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 247