कुटुंबापासून दुरावलेली, ज्यू धर्म त्यागातूनही सदैव ज्यू ठरलेली
जर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन
राहिलेली एक ऑस्ट्रियन .... 'मला कायम निराश्रितासारखं
वाटतं ' असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर.
आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं
जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव
पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरुषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक
श्रेयसुध्दा सहका-यांकडूनच हिरावून घेतलं गेलं आणि तरीही
किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले
जिचं अभिजात कर्तुत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या
वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, टी विसाव्या शतकातली थोर
मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर...
वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाचं विस्मयकारी दर्शन
घडवणारं, लीझ माइट्नरचं हे उत्कंठावर्धक चरित्र...
Author: Veena Gavankar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 116