जोतीराव फुले यांचा जन्म १८२७ साली झाला, जोतीरावांचे शिक्षण पुणे शहरातील शाळेत झाले. ती शाळा स्कॉटिश मिशनरी चालवत असत. या शाळेत ते इतर जातीच्या मुलांमध्ये मिसळत असत. त्यात अस्पृश्य जातींची मुलेही असत. तरुण वयातच त्यांनी अहमदनगर येथे अमेरिकन मिशनऱ्यांनी चालवलेल्या मुलींच्या शाळेला भेट दिली होती आणि तिने ते अतिशय प्रभावित झाले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ऐन विशीत असतानाच त्यांनी कनिष्ठ जातीच्या मुलींकरता शाळा काढण्याची प्रेरणा घेतली. नंतर त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. त्या शाळांतून महार, मांग आदी अस्पृश्य जातीच्या मुलांना प्रवेश दिला जात असे.
१८७०च्या सुमारास फुले हे महाराष्ट्रातील एक वजनदार व महत्त्वाची व्यक्ती म्हणून नावारूपाला आले. त्यांचे जे लिखाण या काळात प्रसिद्ध झाले, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच भारदस्त झाले. १८७३ साली फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- शेतकऱ्याचा असूड
- गुलामगिरी
- सार्वजनिक सत्य धर्म
- छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा
अशी सर्व माहीती या पुस्तकात सांगितली आहे
Author: Jyotirao Govindrao Phule | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 415