महात्मा जोतीराव फुले एकोणिसाव्या शतकातील फार मोठे सामाजिक क्रांतिकारक, लेखक आणि समाज – प्रश्नांविषयी जाण असलेले समाजचिंतक होते. आजच्या महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे.म. फुले यांनी आयुष्यभरात स्त्री – शूद्रातिशूद्रांची जगण्याची फरपट, बहुजन शेतकरी-कष्टकऱ्यांची दैन्यावस्था, शिक्षणाच्या अभावामुळे सामान्यांच्या वाट्याला आलेला अज्ञानाचा अंधार, मतलबी उच्चवर्णीयांचा दांभिकपणा अन् पिळवणूक यासंबंधी विद्रोही लेखन केले. अस्पृश्योद्धाराची कृती स्वत:पासून सुरू करून स्त्रीशिक्षणाची ज्योत पेटविली.म. फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा त्यांच्यानंतर अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी पुढे नेली. त्यातील एक आहेत विदर्भातील चिखली येथील पंढरीनाथ सीताराम पाटील. या सत्यशोधकाने अथक प्रयत्नाने संशोधन करून महात्मा जोतीराव फुले यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र लिहिले. इ.स.१९२८ साली स्वतः प्रकाशित केले. ही दुर्मीळ पहिली आवृत्ती नाशिकच्या सार्वजनिक ग्रंथालयात उपलब्ध झाली. मराठीतील हे अक्षरधन योग्य दुरुस्त्यांसह वाचकांसाठी नव्याने प्रकाशित केले आहे.- बाबा भांड
Author: Pandharinath Sitaram Patil | Publisher: saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 231