सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या 30 महान लोकांच्या अंतर्दृष्टी स्कॉट जेफरी मिलर वॉल स्ट्रीट जर्नलचे बेस्टसेलिंग लेखक आणि जगातील सर्वात मोठे साप्ताहिक ऑन लीडरशीप पॉडकास्टचे होस्ट असे अनेक लोक असतात, ज्यांना आयुष्यभर नवीन काहीतरी शिकण्याची आस असते, ज्यांना यशाची नवनवीन शिखरे गाठायची असतात आणि त्यासाठी ते नेहमी प्रॅक्टिकल अशा टेक्निक्सच्या मार्गदर्शनाच्या शोधात असतात, अशा सर्वांसाठी मास्टर मेंटॉर्स हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील ३० सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकांच्या मनन आणि चिंतनाचं सार दिलेलं आहे. या महान हस्तींमध्ये टॉप बिझनेस माइंडस्बरोबरच आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट थॉट लीडर्सचाही समावेश आहे. या पुस्तकात फ्रँकलिन कोव्हेच्या ग्लोबल पॉडकास्ट 'फ्रँकलिनकोव्हे ऑन लीडरशीप पॉडकास्ट'वर स्कॉट यांनी ज्या महान हस्तींच्या मुलाखती घेतल्या, त्यातील ३० महान लोकांच्या अशा अंतर्दृष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यांनी त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. या पुस्तकात तुम्ही स्वतःला जसे सादर करता तो तुमचा ब्रँड बनतो. विचारपूर्वक ठरवलेले धोरण विरुद्ध त्वरित ठरवलेले धोरण आकर्षक स्कोअरबोर्ड तयार करा ! नवीन शोध लावणं शक्य नसेल, तर आहे त्यात बदल करा कार्यक्षमता आणि प्रभावीपणाचा समतोल निर्भय विरुद्ध बेफिकीर दृष्टिकोनाची शक्ती .... अशा ३० अंतर्दृष्टी
Author: Scott Jeffery Miller | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 256