द टाइम्स, फायनान्शियल टाइम्स, इकॉनॉमिस्ट आणि न्यू स्टेट्समनतर्फे ‘बुक ऑफ द इयर’ म्हणून निवड
वाळू, मीठ, लोह, तांबं, तेल आणि लिथियम या पदार्थांनी आपलं जग बांधलं आणि हेच पदार्थ आपल्या भविष्याला आकार देतील.
यांनीच आपल्याला अंधाऱ्या युगांपासून इथवर आणलं आहे. हे पदार्थ आपल्या कम्प्युटर्स आणि फोन्सना ऊर्जा पुरवतात, आपली घरं बांधतात, ऑफिसेसना आकार देतात आणि जीव वाचवणारी औषधंदेखील तयार करतात. पण या कळीच्या सहा पदार्थांना आपल्यापैकी बहुतांश लोक गृहीत धरतात. जगभर प्रवास करून आपल्या दृष्टीस क्वचितच पडणाऱ्या गुप्त विश्वाला मटीरियल वर्ल्डमध्ये एड् कॉन्वे उघड करतात. हवामान बदल, ऊर्जा संकट आणि नव्या जागतिक संघर्षाच्या धोक्याशी दोन हात करतांना हे सहा पदार्थ कधी नव्हते इतके महत्त्वाचे का बनले आहेत ? हे कॉन्वे दाखवून देतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा सुप्त लढा आपल्या भू-राजकीय भवितव्याला आकार देणार आहे.
Author: Ed Conway | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 392