सत्य काय आहे हे मला माहीत आहे असं मानणं म्हणजे संदेह आणि माझा अनुभव खूप लहान आहे, सत्य याहून खूप मोठं असू शकतं. माझं अंगण छोटसं आहे. हे अंगण म्हणजे संपूर्ण आकाश नव्हे. माझी खिडकीछोटी आहे. परंतुखिडकीची चौकट म्हणजे आकाशाला घातलेली चौकट नव्हे. मी खिडकीतून बाहेर पाहू शकतो हे खरं असलं तरीही खिडकी म्हणजे आकाश नव्हेच हे जाणून घेणं म्हणजे श्रद्धा`. कबीरासारखे वेडे फार क्वचित भेटतात, हाताच्याबोटांवर मोजता येतात आणि त्यांचं वेडही असं आहे की त्यांच्या सुरईतल्या मद्याचा एक थेंब जरी तुमच्या वाट्याला आला तरी स्वत:चं अहोभाग्य समजा. त्यांच्या वेडेपणाचा तुम्हांला किंचितसा स्पर्श जरी झाला तरी तुम्ही निरोगी, शांत होऊन जाल. त्यांच्या वेडेपणानं तुम्हाला थोडं जरी वेडं केलं, तुम्हीही कबीरासारखे नाचू गाऊ लागलात तर त्याहून कोणतंच मोठं भाग्य नसेल तुमचं. ते तर परम सौभाग्य आहे. ओशोंनी ... जगातील साहित्यामध्ये जी काही मूल्यवान रत्ने आहेत ती शोधून त्यांवर आपले विचार विस्तृतपणे मांडले आहेत. परंतु टीकेबरोबरच समन्वयाचे जे अद्भूत सामंजस्य साधले गेले आहे ते सोन्याला सुगंध येण्यासारखेच आहे... असाच काहीसा समन्वय कबीरांमध्येही दिसून येतो... ओशोंचे साम्य सर्वाधिक कबीराबरोबरच आहे... कबीर आणि ओशो या दोन वेड्यांनी एकत्र येऊन हा शब्दांचा महाव्यूह उभारला आहे.
Author: OSHO | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 168