Description
पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या विचारी वगैरे
बिचारा खरोखर भिकारी निघाला
मला वाटले की पुढारी वगैरे
जगा तूच किंमत करावीस माझी
तुला शोभते सावकारी वगैरे
कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो जिव्हारी वगैरे
तिथे एकटा तोच होता दरिद्री
रुबाबात होते पुजारी वगैरे
अता फक्त होतात भेटी मनांच्या
मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे
किती जीवना रोज देतोस धमक्या
दिली का यमाने सुपारी वगैरे?
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे
मी वगैरे
Details
Author: Vaibhav Joshi | Publisher: Rasik Sahitya | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 89