Description
मृण्मयी मात्र केवळ शब्दकृत्य नव्हतं. तो एक आध्यात्मिक अनुभव होता. अश्या तश्या कुणाचा नव्हता, तो मीरेचा होता. मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाउन राहिली. राजाची राणी असल्यामुळं उणं कुण्या गोष्टीचं नव्हतं. तिच्या इथं जो येई, त्याला इच्छाभोजन मिळे. एके दिवशी एक तरणादेखणा जोगी येउन उभा राहिला त्यानं इच्छाभोजनाचं ऐकून मीरेला तिचं शरीर मागितलं. इवलं हसून ती म्हणाली, बस हेच मागितलंत ते माझं उरलंच आहे कुठं?
Details
Author: G. N. Dandekar | Publisher: Mrunmayee Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 257