ज्यांची घराणी राजकारणात आहेत आणि ज्यांच्या घरात राजकारण आहे, अशा मुरब्बी नेत्यांनी, त्यांच्या निष्ठावंत, भाबड्या कार्यकर्त्यांनी, बेरकी नातेवाईकांनी आणि वेशीत घोडं अडवणाऱ्या विरोधकांनी दिलखुलास आस्वाद घ्यावी अशी...
सरकारमहर्षी डोंगरे - देशमुख यांच्या शलाका आणि नेत्रादेवी या दोन सुनांमधील सत्तासंघर्षाची, वादळी कुटुंबघेणी कर्मकहाणी नागकेशर !
नागकेशराचा वेल हुमनी किड्यापेक्षा जालीम ! रानात उगवला तर बोल- बोल म्हणता अख्खा फड खाऊन फस्त करतो.
'पोट' आणि 'पोटचं' या दोनच बिंदूभोवती गरगरा फिरणारा पुरोगामी महाराष्ट्र ! गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेटत जाणाऱ्या डावपेचांची आणि निवडणुकांच्या हैदोसाची सुरंगी वात
नागकेशर !
Author: VISHWAS PATIL | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 396