Description
‘पहाट होई ती दयाळ पक्ष्याच्या भूपाळीने. क्षितिजाकडे कललेला चांदोबा दिसे. झाडांचे उंच-उंच बुंधे, पर्णहीन असा त्यांचा विस्तार – यावरचे आभाळ हळूहळू उजळत जाई. माझ्या निवासापुढे कडीला टांगलेला वंâदील फिकट पिवळा दिसू लागे. मग झटपट अंथरूण गुंडाळून मी आयुष्यातल्या या नव्या दिवसाचे सार्थक करण्यासाठी बाहेर पडत असे....’ भंडारा जिल्ह्यातील ‘नागझिरा’ अभयारण्यात गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था; केवळ या अल्पशा भांडवलावर लेखकाने मुक्काम ठोकला. काय सापडले या जंगलसफरीत... त्याचा हा वृत्तांत!
Details
Author: Vyankatesh Madgulkar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 96