अनेकदा गुंतागुंतीची परिस्थिती समोर ठाकते माणसाच्या आयुष्यात.
ही गुंतागुंत मांडणं हे लेखक म्हणून मी माझं प्रथम कर्तव्य मानलं आहे.
या परिस्थितीत माणसं कशी वागतात हे मी पाहते आहे.
यातलं चूक बरोबर ठरवणं हे मीच नव्हे, तर कुणीच ते पाहताना
तरी करू नये, असं मला वाटतं. कारण आधीच एखादी भूमिका घेतली,
तर ही अभूतपूर्व परिस्थिती, आहे त्या नितळ स्वरूपात आपल्याला दिसणार नाही.
अगदी नेमक्या याच परिस्थितीत आपण जर त्या माणसाचं जन्मापासूनचं
संचित घेऊन उभे ठाकलो, तर आपण काय करू ?
हा प्रश्न खूप कळीचा आहे. कदाचित आपण तेच करू जे त्यानं केलं.
ज्या माणसांना आपण असं असं कधीच वागणार नाही,
अशी खात्री वाटते त्यांचा मला हेवा वाटतो.
आयुष्यातल्या अतर्क्य शक्यतांबद्दलची त्यांची कल्पना
तोकडी पडतेय असं तर नसेल ?
Author: Meghana Pethe | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 336