Description
पूर्वी उपेक्षा करून मारण्याचा प्रयत्न झाला. मी शिल्लक आहे. आता आक्रस्तळेपणा, उपहास करण्याचा प्रयत्न आहे. याने मी मरणार नाही. माझे मरण मला निरूत्तर करणा-या खंडनात आहे. जे मला पुरावा व तर्क यांनी खोडून काढता येत नाही, ते मी हट्ट न करता निमूटपणे स्वीकारतो. म्हणून कुणी मला निरूत्तर करणारे खंडन केले, तर मी माझी मते सोडून त्याची मते स्वीकारीन. ते माझे खरे मरण आहे. त्या मरणाची मला भीती आहे. तेव्हा मी नामशेषही होईन व कृतार्थही होईन.
Details
Author: Narhar Kurandkar | Publisher: Deshmukh & Cmpany Publishers | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 260