ऑपरेशन ब्लू स्टार (Operation Blue Star)

By: L.J.K.S.Brar (Author) | Publisher: Rohan Prakashan

Rs. 270.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

ऑपरेशन ब्लू स्टार ही जगातील सर्वात वादग्रस्त आणि बहुचर्चित लष्करी कारवायांपैकी एक होती असं म्हणता येईल. लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं. लष्कराच्या इतिहासात वादग्रस्त ठरलेल्या अशा या थरारक कारवाईचं स्वत: ब्रार यांनीच केलेलं हे अतिशय अचूक आणि तपशीलवार वृत्तांत-कथन! यात कुठलेही तपशील वगळले नाहीत की कोणतीही अतिशयोक्ती नाही.
लष्करी तुकडयांना काहीवेळा अनपेक्षितपणे घ्यावी लागलेली माघार, अधिकाऱ्यांचे चुकलेले अंदाज, अतिरेक्यांचा चिवटपणा आणि निर्धार अशा सगळयाच तपशीलांचं यात सत्यकथन आहे. कारवाईबाबतच्या व्यूहरचनांचे नकाशे, छायाचित्रं आणि दिलेली अचूक आकडेवारी यामुळे या कथनाला एक विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग आणि मोहिमेतले चढ-उतार यांचं यथार्थ वर्णन या पुस्तकात वाचायला मिळेल.
केवळ शिखांच्याच नव्हे, तर सर्वच भारतीयांच्या मनात खदखदत असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत हे पुस्तक अनेक अफवा, गैरसमज आणि असत्य गोष्टींचं निराकरण करतं.
या कारवाईच्या प्रत्येक टप्प्यावरील नियोजनात आणि प्रत्यक्ष कारवाईत ब्रार सहभागी होते. त्यांच्याच शब्दातली ही कहाणी…पूर्णपणे सत्य, अगदी जशी घडली तशी…’ऑपरेशन ब्लू स्टार’

Details

Author: L.J.K.S.Brar | Publisher: Rohan Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 118