पांचाली (Panchali)

By: Suhas Shirvalkar (Author) | Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd.

Rs. 330.00 Rs. 310.00 SAVE 6%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

अगदी सहज पीत होता तो. पिण्यामागे उद्देश काहीच नव्हता. प्रेमभंग व्हायला त्याचं कोणावर प्रेम नव्हतं. त्याच्यावर कोणाचं प्रेम नव्हतं. मनात कुठे नैराश्य आहे म्हणावं, तर त्याच्या चेहऱ्यावर 'देवदास'ची छाप नव्हती. आयुष्याचा कंटाळा येऊन पिण्याइतका भ्याडही नव्हता तो! खरंचच सहज पीत होता तो. ओन्ली टु किल द टाइम ! जवळ भरपूर पैसा होता. मेला असता तर पैशावर हक्क सांगणारंही कोणी नव्हतं. कोणाकरता शिल्लक ठेवायचा पैसा? त्यापेक्षा मनमुराद उधळला तर? नशीबवान होता तो. लोक पैसा उधळून कंगाल होतात; पण नको नको म्हणत असताना लक्ष्मी लाखांच्या आकड्यांत त्याच्या बँकेतल्या खात्यावर जमा होत होती. दोन लाख उडवावेत; तर त्या वेळी बँकेत दहा लाख जमा झालेले असत! पैसा ही चीजच अजब आहे. मिळवू म्हणून मिळवता येत नाही, घालवू म्हणून घालवता येत नाही. त्याला काही तासांपूर्वीचीच गंमत आठवली अन् तो दिलखुलास हसला. वाटेल ते झालं तरी आज खिशातले दहा हजार रुपये संपवून घरी जायचं असा निश्चय करून तो गॅम्लिंग हाउसला आला होता. पैसा घालवायला फ्लशसारखं दुसरं साधन नाही! पण मिळवायलाही फ्लशसारखं दुसरं साधन नाही हे तो विसरला होता. अक्षरशः दहा डाव ब्लाइन्डमध्ये खेळला होता तो. सहा जण सीनमध्ये त्याला कव्हर करत होते. स्टेक जबरदस्त. शंभर रुपये ब्लाइन्ड; दोनशे रुपये सीन... मिनिमम ! नो मॅक्स लिमिट ! किती जिंकावेत त्यानं ? मधून उठून जाण्याची वीस हजार पेनल्टी भरून तो उठला तेव्हा त्याच्या खिशात नेट एक लाख, सात हजार, दोनशे रुपयांची प्लॅस्टिक कॉइन्स होती!

Details

Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 232