Description
महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला.
मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला.
Details
Author: Vishwas Patil | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 613