प्रभावी भाषणकला साधना आणि अविष्कार (Prabhavi Bhashankala Sadhana Aani Avishkar)

By: Dr. Shweta Rathod (Author) | Publisher: Sumeru Printers & Publishers

Rs. 170.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

लोकशाहीत आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत 'भाषणकला' ही नितांत आवश्यक बाब झाली आहे, हे वेगळे सांगण्याची गरज आहे, असेही नाही. 'प्रभावी भाषणकला' साध्य करावयाची असेल तर 'साधना' तर करावीच लागेल... तरच तिचा 'आविष्कार' उत्तम रीतीने आणि परिणामकारक होऊ शकेल. हाच हेतू मनात धरून प्रा. सुरेखा कटारिया आणि डॉ. श्वेता राठोड यांनी हे एक भाषणकलेविषयी अधिकतर तपशीलवार पुस्तक 'प्रभावी भाषणकला : साधना आणि आविष्कार' नामक लिहिले आहे; आणि 'सुमेरू प्रकाशन' ते प्रकाशित करीत आहे. तसे तर हे या विषयातील समाजप्रबोधनच आहे... आणि भारतीय संस्कृतीत ही प्रबोधन परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. कर्नाटकात ११०० वर्षांपूर्वी 'जिनसेनाचार्य' नामक एक महान विद्वान जैन आचार्य होऊन गेले. त्यांनी संस्कृत भाषेत एक महापुराण नावाचा प्रचंड ग्रंथ लिहिला आहे. आजही तो पाच खंडांमध्ये उपलब्ध आहे. मराठीतही त्याची भाषांतरे/अनुवाद झाले आहेत. एक मराठी भाषांतर कोल्हापूरच्या स्व. कल्लप्पा भरमाप्पा निटवे शास्त्री यांनी शतकापूर्वी केले आहे. या पंडित निटवे शास्त्रींवर कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांची खास मर्जी होती. त्यांच्या प्रेससाठी राजर्षींनी खास जागा दिली होती. त्यातूनच शास्त्रीजींनी 'महापुराण' हा पाच खंडात्मक, मराठी अनुवादासहित ग्रंथ प्रकाशित केला. नवल असे की, या महापुराणातही वक्त्याची काही लक्षणे सांगितली आहेत.

Details

Author: Dr. Shweta Rathod | Publisher: Sumeru Printers & Publishers | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 144