‘दि फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम’ (प्रथम अर्थात् अंतिम मुक्ती) हे एका ब्रिटिश प्रकाशकाने पहिल्यांदा प्रसिद्ध केले ते १९५४ साली. ‘जे. कृष्णमूर्तीच्या शिकवणुकीचे (टीचिंग्ज) एक सविस्तर पुस्तक व्हावे’ या त्यावेळी जगभरातून होत असलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून हे पुस्तक प्रकाशित केले गेले. ऑल्डस हक्सले यांची प्रस्तावना लाभल्याने हे संकलन आणखी समृद्ध झाले आहे. पुस्तकामध्ये दोन विभाग आहेत. एक भाग कृष्णमूर्तीच्या जीवनचिंतनाचा आहे, तर दुसऱ्या भागात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे एकत्रित करण्यात आली आहेत. ‘कंटाळा’, ‘व्यर्थगप्पा’ यांपासून ते ‘आत्मबोध’, ‘ईश्वरा’ पर्यंत अगदी वैविध्यपूर्ण विषय यात सामावलेले आहेत. कृष्णमूर्तीच्या शिकवणुकीचा परिचय करून घेण्यास उत्सुक असलेल्यांसाठी ‘प्रथम अर्थात् अंतिम मुक्ती’ ही नक्कीच एक उत्तम सुरुवात ठरेल.
या पुस्तकामधून वाचकांना मूलभूत मानवी समस्येचे यथास्पष्ट, समकालीन विधान गवसेल आणि हा तिढा सोडविण्याचे आव्हानही मिळेल, जो केवळ एकाच मार्गाने सुटू शकतो – स्वतःसाठी व स्वतःद्वारे.
Author: jiddu krishnamurti | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 309