पु. ल. देशपांडे यांचे छोटे मोठे लेख, त्यांनी पाठविलेली पत्रं, साहित्य अकादमीचे पारितोषिक स्वीकारताना
केलेले भाषण, काही(च्या काही) कविता अशी भन्नाट मुशाफिरी या पुस्तकात अनुभवायाला मिळते. रावसाहेब,
सख्राराम गटणे या वल्लींबरोबरच खानोलकर आणि वूडहाऊस यांच्यासारखे दिग्गजही येथे भेटतात.
असा मी असा मी, पूर्वरंग यांच्यासारख्या त्यांच्या पुस्तकातील लेख.
'अपूर्वाई'ची प्रस्तावना, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेलं लेखन या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतं.
वामनराव देशपांडे, बाबाआमटे, केशव मेश्राम आदींना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेशही पुस्तकात आहे. चौपाटीवर,
एक होती ठम्माबाई, सवाल अशा कवितांचासाझी पुस्तकाला आहे कायमची आठवणीत राहणारी, कधी संपूच नये असं वाटायला
लावणारी ही साठवण.
Author: Pu La Deshpande | Publisher: Majestic Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 517