एका सर्वोच्च कन्नड साहित्यिकाने लिहिलेले गाजलेले पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे नेमकं काय? त्यांच्याशी नाळ जुळलेल्या पक्षाच्या हाती भारताची सत्ता असताना ते भारताला कुठे नेणार? महत्त्वाचे म्हणजे, त्यांचा कशावर विश्वास आहे आणि ते काय नाकारतात?
या काही प्रश्नांची उत्तरं देवनुरा महादेव या पुस्तिकेतून देतात. दंतकथा, लोककथा आणि आधुनिक तत्त्वे यांचा संगम त्यांच्या राजकीय कथनशैलीतील स्पष्टतेसह होताना दिसतो. त्यांच्या नर्मविनोदी शैलीत ते वाचकांना सांगतात- जेव्हा रा.स्व. संघाचे अपशकुनी दूत ‘कूगु मारीस’ आपल्या दारी येतात, तेव्हा त्यांना प्रवेश देऊ नका. गावात जसं दारावर, ‘नाळे बा’ (उद्या या) लिहून ठेवतात, तसंच लिहून ठेवायला हवं, कारण उद्या कधीच येत नसतो. हे लेखन अद्वितीय आहे, कारण त्यात राजकीय कृतीची हाक आहे आणि तत्त्वनिष्ठेचीही हाक आहे.
Author: Devanura Mahadev | Publisher: Madhushree publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 147