शेकडो वर्षांपासून मानवजातीने अस्तित्वाच्या असामान्य आणि अलौकिक परिमाणांचे आकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी विवेकानंद 'राजयोगा'ला या प्रयत्नांचा परिपाक म्हणून मांडतात. ज्यामध्ये देवप्राप्तीसाठी प्रणालीबद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवला आहे. एकाग्रता आणि ध्यानाच्या तंत्राद्वारे, हा ग्रंथ वाचकांना मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि उच्च चेतनास्थिती साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
'राजयोग' हे मनाचे नियंत्रण आणि आत्मसाक्षात्कार याविषयीचे एक सखोल अध्ययन आहे, प्राचीन योगाचे तत्त्वज्ञान आणि पद्धती अत्यंत व्यावहारिक आणि सुलभ भाषेत यामध्ये मांडले आहे.
स्वामी विवेकानंदांनी १८९५-९६च्या हिवाळ्यात न्यूयॉर्क शहरात दिलेल्या व्याख्यानांवर हे पुस्तक आधारित आहे. आध्यात्मिक प्रबोधन शोधणाऱ्या साधकांसाठी 'राजयोग' शाश्वत ज्ञान प्रदान करते. आधुनिक जगात आध्यात्मिक मार्ग शोधणाऱ्यांसाठी स्वामी विवेकानंदांची शिकवण एक प्रकाशस्तंभ आहे, जी मार्गदर्शन करते आणि प्रेरणाही देते.
लेखकाविषयी माहिती : स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ला उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले होते. स्वामीजी एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माचा दर्जा प्राप्त करून देऊन आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. १८९३मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय स्वामी विवेकानंदांनी दिला. ४ जुलै १९०२ला त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.
Author: Swami Vivekananda | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 192