शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील कापूस उत्पादक रामराव पंचलेनीवार यांनी २०१४ मधील एका सकाळी दोन बाटल्या कीटकनाशक प्राशन केले. जर आत्मघाताचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर शेतकरी आत्महत्येच्या आकड्यांमधील (आता अप्रकाशित) इतरांसारखा एक आकडा बनून राहिले असते. कारण भारतात प्रत्येक तीस मिनिटाला एक शेतकरी आपले प्राण गमावतो. केवळ महाराष्ट्रातच गेल्या दोन दशकांत अशा ६० हजार आत्महत्या झालेल्या आहेत. पण चमत्कार व्हावा तसे रामराव यातून बचावले. या पुस्तकात ग्रामीण भागात कार्यरत असलेले संवेदनशील पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी देशातील कधीही न संपणारे शेतीचे संकट शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. रामरावांच्या माध्यमातून त्यांनी शेती संकट सोप्या शब्दांत मांडले आहे.
Author: Hardikar Jaideep | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 231