फ्रेड उल्मान: जर्मनीतील टुटगार्ट येथे जन्मलेल्या फ्रेड उल्मानला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वदेश सोडावा लागला. तो चित्रकार होता,
कवी होता आणि उदरनिर्वाहासाठी कायद्याचे उच्चशिक्षणही त्याने घेतले होते. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होताचं दोनच महिन्यात त्याने देश सोडला, फ्रांस, स्पेन या देशांत नशीब आजमावत तो अखेर ब्रिटनमध्ये स्थिरावला. युद्धाला तोंड फुटल्यावर शत्रू राष्ट्राचा नागरिक म्हणून ब्रिटनने त्याला सहा महिने तुरुंगवासात टाकले. पण त्यानंतरचे त्याचे आयुष्य ब्रिटनमध्ये कलावंतांच्या सहवासात गेले. चित्रकार म्हणून तो ख्याती पावला. त्याची चित्रे ब्रिटनमधील अनेक संग्रहालयांत प्रदर्शित केलेली आहेत. रीयुनियन हि त्याची कांदबरिका प्रसिद्ध झाल्यावर दुर्लक्षित राहिली. परंतु मध्ये ती पुनः प्रकाशित झाली तेव्हा ऑर्डर कोस्लरच्या नजरेत आली, आणि मग यशस्वी ठरली.
Author: Fred Uhlman | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 135