व्यासांनी महाभारत का लिहिलं... ते कुणी लिहून घेतलं... देवव्रताचा भीष्म कसा झाला...कौरव-पांडवांचा, कर्णाचा जन्म कसा झाला...वुंÂतीने कर्णाचा त्याग का केला...कर्ण पराक्रमी असूनही त्याच्या वाट्याला अवहेलना का आली... लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याची योजना कुणी केली आणि ती कुणी फिस्कटवली...द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अज्ञातवासात असलेले पांडव तिथे कसे प्रकट झाले...शकुनी आणि दुर्योधनाने युधिष्ठिराला द्यूत खेळण्याचं आमंत्रण का दिलं... द्रौपदीला भर सभेत फरपटत आणून तिचं वस्त्रहरण करू पाहणाNया दु:शासनाची कशी फजिती झाली...कौरवांनी घातलेली बारा वर्षांच्या वनवासाची आणि एक वर्षाच्या अज्ञातवासाची अट पांडवांनी कशी पूर्ण केली...कौरव-पांडव युद्ध का झालं...त्याचा परिणाम काय झाला...या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बालदोस्तांनो तुम्हाला मिळतीRल महाभारतात...आणि हे महाभारत सचित्र आहे दोस्तांनो, त्यामुळे कौरव-पांडव, वुंÂती, भीष्म इ. तुम्हाला चित्रांतून भेटणार आहेत. आमची ही सचित्र भेट तुम्हाला नक्कीच आवडेल.
Author: Vrushali Patwardhan | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: