उमललेली फुलं डोळ्यांना दिसतात; पण गळून गेलेली कळी कोणास दिसत नाही. अशा कळ्यांचा म्हणजेच शोषित, पीडित, युवा, कामगार अशा सर्वांसाठी अविरत झटणारा महाराष्ट्राचा युवा दादा. महाराष्ट्रभूमीला हेवा वाटावा असे हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व. समाजाचे विशेषतः तरुण पिढीचे दादांबद्दलचे प्रेम लक्षात घेऊन प्रिय मित्र शुभम याने दादांवर लिहिलेले हे पुस्तक वाचकाच्या मनात उतरेल आणि संपूर्ण वाचकास भारावून टाकेल. शुभम म्हणजे दादांवर प्रेम करणारा निस्सीम चाहता होय. त्याने प्रेमपोटी केलेले हे लेखन जनमानसात रुजेल. वरवरचं दिसणारं सौंदर्य हे देवाने दिलेले आहे, पण अंतःकरणाचे सौंदर्य माणूस घडवतो. अशा शुद्ध, सुंदर अंतकरण असलेल्या दादांच्या हातून महाराष्ट्राची अविरत सेवा घडत राहो हीच प्रार्थना. निसर्गाला बंधन नाही नियतीला धाक नाही, माणसाच्या मनाचा विचार करायला कोणाला सवड नाही मग अशा द्वंद्वात उभा राहतो, तो आणि जाणतो रथचक्र माणसाच्या मनाचा आणि होतो सारथी त्या रथाचा कारण तो योद्धा आहे या भूमीचा रोहित दादा योद्धा आहे या भूमीचा - ऋषिकेश सुजाता विश्वनाथ पांडे-
Author: Shubham Sunita Satish Mitkal | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: