चक्रवर्ती सम्राट अशोक (जन्म इ. स. पूर्व ३०४-मृत्यु इ. स. पूर्व २३२) हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ. स. पूर्व २७२ ते इ. स. पूर्व २३२ दरम्यान राज्य केले.
आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडील आसाम तर दक्षिणेकडील म्हैसुरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. चक्रवर्ती सम्राट अशोक जगातील सर्वात महान आणि शक्तीशाली सम्राटांमध्ये अगदी शीर्षस्थानावर आहेत. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासातही सर्वात महान सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमाणसांवर तसेच भारताच्या मोठ्या भुभागावर राज्य केले, अशाच सम्राटांना दिले जाते. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होऊन गेले. ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आहेत; परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे म्हणतात की, प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले व शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले, त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही.
Author: V G Apate | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 176