संग्राम (Sangram)

By: V. S. Walimbe (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 140.00 Rs. 135.00 SAVE 4%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

'एक सशस्त्र क्रांतिकारक वधस्तंभावर चढून आपल्या जिवाचे बलिदान करतो, तेव्हाच शंभर नि:शस्त्र प्रतिकारकांचा जन्म होऊ शकतो! क्रांतिकारकांच्या प्राणत्यागाचे मर्म हे होते! स्वातंत्र्य-देवतेला स्वत:च्या रक्ताचा नैवेद्य त्यांनी दाखवला. ते अग्निसंप्रदायाचे उपासक होते. तुमच्याविरुध्द या देशात हजारो बंडे उभी राहतील असे उमाजी नाईक यांनी १८२७ सालीच कंपनी सरकारला बजावले होते. त्यांचे बोल खरे ठरले! मंगल पांडे, वासुदेव बळवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, गदर पार्टी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग अशी ही क्रांतिकारकांची परंपरा फार, दीर्घ, प्रखर आणि तेजस्वी आहे. इन्कलाब जिंदाबाद! हे त्यांचे प्राणतत्त्व होते. हा होता मातृभूमीच्या मुक्ततेसाठी चाललेला संग्राम. वि. स. वाळिंबे यांच्या सत्तावन्न ते सत्तेचाळीस या ग्रंथातली सशस्त्र क्रांतीची गाथा एकत्र करून सिध्द झालेले हे पुस्तक. (संग्राम)

Details

Author: V. S. Walimbe | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 212