सावित्रीबाई फुले जीवन आणि प्रवास (Savitribai Phule Jeevan Aani Varasa)

By: Ramamurthy Gupta (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 250.00 Rs. 225.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

सावित्रीबाई फुले यांचा जन्म जवळजवळ २०० वर्षांपूर्वी झाला. त्या वेळचा भारत, त्यातलं सामाजिक वातावरण ‘आज’च्या भारतापेक्षा खूप वेगळं होतं. ‘माणूस’ म्हणून जन्माला आल्यावर मिळणारे अधिकार हे त्या काळी केवळ तो कुठे आणि कोणाच्या पोटी जन्माला येतो, यावर अवलंबून होते. स्त्री आणि पुरुष यांना वेगळे नियम, ब्राम्हण आणि शूद्र यांना वेगळे नियम अशी परिस्थिती होती. समाजाने आखून दिलेल्या मर्यादा ओलांडण्याची परवानगी ना स्त्रियांना होती ना शुद्रांना.

मात्र मर्यादांची ती चौकट मोडण्याचे धारिष्ट्य सावित्रीबाई फुले यांनी दाखवले. सामाजिक असमानतेच्या या लढाईत सावित्रीबाईंना त्यांचे मार्गदर्शक असणाऱ्या जोतीराव फुले यांची साथ लाभली. समाजात अन्याय, अत्याचार करणाऱ्या ज्या शक्ती होत्या, त्यांच्याविरोधात त्या लढल्या. त्यांची ही लढाई फक्त स्त्रीशिक्षणासाठीच नव्हती; तर त्याबरोबरच विधवांना जाचक परिस्थितीतून मुक्त करण्यासाठीही होती. सावित्रीबाई अस्पृश्य आणि मागास वर्गातील लोकांना शिक्षित करण्यासाठीही लढल्या.

Details

Author: Ramamurthy Gupta | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 214