Description
‘सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण र्मूिच्छत पडल्यावर - या साNया महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून ‘पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं ‘सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची कादंबरी
Details
Author: Abhiram Bhadkamkar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: