शैताली इज शैताली ! तिची सर कोणालाच नाही ! शैताली! - फार जणांनी प्रयत्न केले. तिला अजून कोणी समजूच शकलं नाहीये! कधी डान्स करताना तुम्ही तिला न बोलावता तुमच्या मांडीवर येऊन बसेल; पण म्हणून दुसऱ्या दिवशी तिला हात लावायचा प्रयत्न केला तर- कदाचित तुम्हाला गाल चोळत बसावं लागेल ! म्हणून म्हटलं- शैताली इज शैताली ! हॉटेल मरिन व्हयू संध्याकाळी सहाला उघडतं; पण सहाला आत कुत्रंसुद्धा नसतं. रात्री अकरा-साडेअकराला गेलात तरी तुम्हाला बसायला टेबल राहणार नाही. येस. शैताली रात्री बारा वाजता येते! पहाटे चारनंतर पुन्हा हॉटेल ओस ! शैताली पहाटे चारला निघून जाते ! ओनली फोर अवर्स! तिला दरमहा दोन हजार रुपये मिळतात. शिवाय लक्षाधिशांकडून मिळणारी टिप. दरमहा सात-आठ, सात-आठ हजार आहेतच ! काय करते एवढ्या पैशांचं? विचारून बघा! 'इट्स नन् ऑफ युवर बिझनेस !' एकच उत्तर, तोंडानं किंवा कृतीनं! मूडमध्ये असेल तर विचारेल 'तुला हवाय? किती देऊ?' अपार्ट फ्रॉम धिस मुद्दा एकच ! हटिल मरिन व्हयू शैतालीच्या जिवावर चालतं! नो शैताली - नो हॉटेल मरिन व्यू !
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd. | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 164