स्वराज्याची स्थापना करीत शिवराय ‘रयतेचा राजा’ बनले. त्यांचा पराक्रम, धाडस, शूरता अशा अनेक गुणांचा मागोवा घेत विजय देशमुख यांनी ‘शककर्ते शिवराय’च्या दोन खंडातून समग्र शिवचरित्र वाचकांपुढे ठेवले आहे.
पहिल्या खंडात सुरुवातीला शिवपूर्वकालीन उत्तर भारतातील व महाराष्ट्रातील स्थिती, त्या काळातील संत परंपरा विशद केली आहे. यानंतर निजामशाही व आदिलशाहीत जी मराठी कुळे उदयास आली, त्यातील सिंदखेडकर जाधवराव या महाराजांच्या मातृकुळाची व वेरूळच्या भोसले या पितृकुळाची माहिती आली आहे. पुढे शिवजन्म, शहाजीराजांचे स्वराज्य स्वप्न, यासाठी शिवरायांनी सुरू केलेला लढा व त्या अनुषंगाने अनेक प्रसंग येतात.
दुसऱ्या खंडात मिर्झाराजे जयसिंह, किल्ले पुरंदरचा तह, महाराजांची विजापूर मोहीम, सरनोबत नेताजी पालकर, आग्र्याची कैद व सुटका, आदिलशाह व पोर्तुगीज, सागरी शत्रू, महाराजांचे विजय पर्व व राज्याभिषेकाचे वर्णन आहे. राजधानी रायगड, जिजाऊंचे निधन, त्यानंतरच्या मोहिमा, संभाजी महाराजांचा रुसवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण, असे प्रसंग व त्याचे सुसंगत विवेचन यात केले आहे.
Author: Vijay Deshmukh | Publisher: Chhatrapati Seva Pratishthan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 1144