सुहास शिरवळकर यांची फिरोज कथा चारमिनारचा लास्ट कश मारून त्याने थोटूक खाली टाकलं, त्याच्या मजबूत बुटाच्या तळव्याखाली थोटूक पार चुरगाळलं गेलं. दमदार पावलं टाकत तो पायरीजवळ येऊन थांबला. त्याने एकदा वर मान करून रोमन लेटरिंग्जवर नजर टाकली - 'कॅसिनो पॅरिस.' निऑन साइनकडे बघत असतानाच दुसरी चारमिनार ओठांमध्ये अलगद सारली गेली. नाकासमोर लाइटरची ज्योत फरफरली. सिगारेटचा एक मजबूत कश मारत तो पायऱ्या चढून वर आला. "सलाम साब! आप कॅसिनो के रेग्युलर मेंबर नहीं हैं।" दणकट हातांनी त्याला रोखत पहारेकरी म्हणाला. तो शांतपणे उभा राहिला. "तुमच्या कॅसिनोचे किती मेंबर्स आहेत?" "चारशे." "चारशे एकावा मिळाला, तर कॅसिनोमध्ये जास्त पैसा होईल ना!" "तसं नाही साहेब. आपण मेंबर होणार असाल, तर माझी काहीच हरकत नाही. मी आपल्याला आत सोडतो. आत गेलात, की डाव्या हाताला जे काउन्टर आहे, तिथे कॅसिनोची असिस्टंट मॅनेजर मिस रूबी मायर बसलेली आहे, तिच्याकडून मेंबरशिपचा फॉर्म घ्या. तो भरून तिच्याजवळ द्या. ती तुम्हाला मेंबरशिपचं लायसेन्स आणि नंबर देईल. तो नंबर मिळाला, की तुम्ही रेग्युलर मेंबर व्हाल." "बँक यू व्हेरी मच फॉर द इन्फर्मेशन." हसून तो म्हणाला. त्याने कोटाच्या खिशातून एक दहाची नोट काढून पहारेकऱ्याच्या हातात सारली. पहारेकऱ्याने लगेच गंभीर मुद्रेनं त्याला एक सलाम ठोकला आणि कॅसिनोचा दरवाजा त्याच्याकरता उघडून धरला.
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 244