Bahirji Naik Combo Set ( Khand 1 te 4 ) By Prem Dhande ( स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाची गाथा खंड (१,२,३ आणि ४ मध्ये)
सह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते
Author: Prem Dhande | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 1574