दिवंगत विचारवंत, लेखक नरहर कुरुंदकर यांच्या राजकीय लेखांचा हा संग्रह आहे. यातील नऊ लेखतीन गटांमध्ये विभागले गेले आहेत.
यातील पहिले तीन लेख हिंदुत्ववादी, हिंदू राष्ट्रवादी राजकारणाची,हिंदू जातीयवादाची मीमांसा करणारे आहेत. नंतरच्या तीन लेखांत
स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी विफल प्रयत्न केलेल्या तीन व्यक्तींच्या विचारसरणींचा, राजकीय कर्तुत्वाचा लेखाजोखा
मांडला आहे.
शेवटच्या तीन लेखांत मुसलमानांच्या धार्मिकतेचे आणि या धार्मिकतेमुळे त्यांच्याराष्ट्रनिष्ठेवर होणाऱ्या परिणामांचे विवेचन केले आहे.
आधुनिक भारतासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांचा त्यांनी विविध अंगांनी वेध घेतला आहे. जातीयवादाला धर्माची चौकट घालू नये, असे ते सांगतात. प्रश्नांचे खरे रूप ते समोर आणतात..
Author: Narhar Kurundkar | Publisher: Deshmukh & Co Publishers | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 186