सावळ्या आणि पारू. दोघंही एकमेकांवर जाम खूश होते. एकमेकांच्या रूपानं जणू त्यांचं नशीब् त्यांच्या हाती आलं होतं. सावळ्याने ही भन्नाट आयडिया आपल्या सुपीक मेंदूत काढली, म्हणून आपल्याला हे सुखाचे दिवस दिसले; अन्यथा आपण आज पोलिसांची चमचेगिरी करीत, प्रसंगी एखाद्या पी.एस.आय.ला खूश करीत, दादा वर्चस्व मान्य करून त्याला हप्ते देत, पाकीटमारच राहिलो असतो. सावळ्या हा नवा मार्ग दाखवून आपल्याला 'स्टँडर्ड' मध्ये आणलं, म्हणून पारू सावळ्याश कृतज्ञ होती; तर आयडिया आपली असली, तरी पारू चातुर्यानं गिऱ्हाईक हेरते, त्याला गळाला लावून आणते, येताना तो जास्तीतजास्त पैसे कसे आणेल्न ते पाहते... या तिच्या चातुर्यावर सावळ्या बेहद्द खूश होता. त्यांच्या या तथाकथित पार्टनरशिपमुळे त्यांच्या आयुष्यात बरेच चांगले दर्शनी बदल घडून आले होते. उच्चभ्रू समाजात वावरण्यासाठीही पारूला या बदलांचा फार चांगला उपयोग झाला होता.
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160