आपल्या नेहमीच्या प्रसन्न तरीही टोकदार शैलीत लग्नाच्या यशापयशामागचं ‘सत्य’ शोधणाऱ्या या पुस्तकात शोभा डे धुडकावून लावतात. जुने नियम… रूढी परंपरांचा नवा अर्थ शोधता शोधता ठेवतात बोट प्रत्येक ‘दुखऱ्या’ मुद्यावर… सासू-सुनेची खिटपिट (एकमेकींबरोबर आनंदात कसं राहावं?), नवरा-बायकोमधला प्रामाणिक सच्चेपणा (काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या; नाही?), प्रणयाचा प्राणवायू (रोमॅन्टिक असण्यात लाज कसली?)… लग्नाचं जिवंत नातं फुलवण्याच्या, बहराला आणण्याच्या युक्त्या आणि कोंडून घालणाऱ्या हिंस्र लग्नातून सुटकेचे मार्ग, शिकता शिकवताना हसवणारं, हसता हसता डोळ्यांत पाणी आणणारं आणि हातात हात घेऊन संसाराच्या समुद्रात उडी टाकलेल्या प्रत्येकाला ‘सुखाचा मंत्र’ देणारं प्रसन्न पुस्तक.
Author: Shobhaa De | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 306