Description
``तू आमचं नेतृत्व कर.`` असं म्हणून भास्करनं आपल्या हातातील मशाल सुमीताच्या हाती दिली. गांधीग्राममध्ये प्रवेश करता-करता तिच्या हातातला कंदील आपल्या हातात घेतला. त्याच्या मनात आलं की, आपल्या ओळखीची सुमीता ही नव्हे... प्रथम आपल्याला गावच्या सडकेवर दिसली, ती ही नव्हे... त्या जुन्या देवळाबाहेर पडताच थोडी अधिक शहाणी झालेली, ती ही नव्हेच... हिच्यात नेमका कोणता बदल झालेला आहे, हे त्याला सांगता येत नव्हतं; पण आत्ताची सुमीता ही नवी होती, एक चमत्कार होता.
Details
Author: B. Bhattacharyya | Publisher: Mehta Publishing house | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 340