वि.स. खांडेकरांचे आजवरचे कथासंग्रह हे विशिष्ट काळात लिहिलेल्या कथांचे आहेत. १९३० ते १९७० अशा तब्बल चार दशकांतील असंकलित कथा `स्वप्न आणि सत्य`च्या माध्यमातून वाचकांस प्रथमच एकत्र वाचावयास मिळत आहेत. त्यामुळे खांडेकर कथालेखक म्हणून कसे विकसित झाले याचा एक सुस्पष्ट आलेख आपसूकच वाचकांपुढे उबा राहतो. बृहत् कालखंडातील विषय, शिल्प, शैली इत्यादींच्या दृष्टींनी वैविध्यपूर्ण अशा या संग्रहातील खांडेकरांच्या गाजलेल्या `चकोर नि चातक` या रूपक कथेचा मूळ खर्डा `स्वप्नातले स्वप्न` वाचताना लक्षात येते की, खांडेकरांच्या कलात्मक कथांच्या मुळाशीही सामाजिक संदर्भ असायचे. खांडेकरांना स्वप्नाळू कथाकार म्हणणाऱ्यांना `भिंती`सारखी प्रतिकात्मक कथा जमिनीवर आणील. `स्वप्न आणि सत्य` म्हणजे कल्पनेकडून वास्तवाकडे मार्गक्रमण केलेल्या मराठीतील कथासम्राटाचा कलात्मक विकासपटच. रंग, स्वाद, आकार, प्रकारांचं हे अनोखं कथा संमेलनच... स्वप्नांचा चकवा नि सत्याचा शोध यांचा प्रत्यय देणाऱ्या या कथा म्हणजे जीवनातील ऊनसावलीचा खेळच!
Author: V.S. Khandekar | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 80