ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षातल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षातल्या… वगैरे – इतिहासापुरतीच मर्यादित होऊन रहायची नसतील तर त्यांना देव हा भ्रम नाकारावाच लागेल. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षाच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या गतकालाचा, अवकाश- काल अस्तित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युलॅरिटीच्याही आधीचा बेध घेण्याची माणसांची कुवत आहे. हे त्यांना निरीश्वरवादातूनच समजू शकेल. संथ गतीने, पण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक, बौद्धिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने पुढे नेणे हे निरीश्वर- वादाचेच काम असेल.
देव एक भ्रम आहे आणि तो तसाच ओळखावा.
Author: Richard Dawkins | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: