आजच्या आधुनिक काळात वित्तव्यवसायात माजलेल्या गोंधळातूनही धनसंचय करता यावा म्हणून प्राचीन काळापासून वापरल्या गेलेल्या सुजाणतेतून येणाऱ्या व्यवहार्य, प्रभावशाली दृष्टीकोनाचा मागोवा घ्या.भावनांवर ताबा ठेवून प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवल्यास यश मिळू शकते ह्याची जाणीव स्थितप्रज्ञ विचारवंतांना प्राचीन काळापासून होती. हेच तत्त्व आज आपल्या आर्थिक व्यवहारांना लागू पडते. शिस्त, मानसिक अलिप्तता आणि संपूर्ण आत्मविश्वासानेच उत्तम गुंतवणुकदार शेअरबाजारात व्यवहारासाठी सज्ज होतो – शेकडो वर्षे हीच शिकवण स्थितप्रज्ञ विचारवंत आपल्याला देत आले आहेत. तरीही अनेक लोक पैसा मिळविण्याच्या खटाटोपात जीव तोडून स्वत:ला झोकून देताना दिसतात. त्यात पैसा तर मिळत नाहीच पण भरपूर वेळही वाया जातो. शिवाय मन:शांती मिळणे तर दूरच!. ह्या प्रयत्नात एखाद्याच्या हाती घबाड लागलेच तर ते तितक्याच तातडीने हातातून निसटूनही जाते. त्यापेक्षा स्थितप्रज्ञतेने तुमच्या वेळेचा सदुपयोग करा आणि तुमच्या सुजाणतेवर प्रभुत्त्व प्रस्थापित करा. भल्याबुऱ्याचा शांतपणे विचार करून स्थिर वृत्तीने विशिष्ट आर्थिक धोरण आखून गुंतवणूक करा आणि शाश्वत स्वरुपाचा धनसंचय करा. सेनेका, एपिक्टिटस ह्यांच्यासारखे गतकाळातील स्थितप्रज्ञ विचारवंत आणि आजच्या आधुनिक युगातील उत्तंग व्यक्तिमत्त्वाचे वॉरेन बफे, कॅथी वुड ह्यांच्या चरित्रांमधून कालातीत, मौल्यवान जाणिवा कशा विकसित होत जातात हा ह्यापूर्वी कधीही पुढ्यात न आलेला धनसंचयाविषयीचा पैलू फरू ह्यांनी ह्या पुस्तकात मांडला आहे.
Author: Darius Foroux | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 249