Description
वय वाढत होत. दिल्लीचं मंडी हाउसदेखील हळूहळू ओस पडू लागलं होतं. सगळे जण मुंबईच्या दिशेने धाव घेत होते. मुंबईत त्यांचं सावकाश बस्तानही बसू लागलं होतं. त्याला तर मुंबईतून बोलावणंही यायला लागलं होतं ‘ये इकडे!’ मुंबई त्याची वाट बघत होती… पण तो गेला नाही. का?
कारण पंखांत बळ असलं, तरी ते फडफडवून भरारी न घेण्याचा निर्णय त्याचा स्वतःचाच होता, याची त्याला पूर्ण जाणीब होती. By choice! पण हा choice हा निर्णय योग्य होता?
अरे यार… दमून गेलो. माणसाने ‘विचार’ केलाच नाही, तर तो किती आनंदी राहील ना! पण ‘विचार’ आणि ‘आठवण’ यात केवढा फरक असतो. आणि ‘आठवणी’ या ‘विचार’ करून थोड्याच येतात ?
– या पुस्तकातून
Details
Author: Piyush Mishra | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 272