अपूर्व राजपूत हे समकालीन मराठी कवितेतील सुप्रसिद्ध तरुण कवी, गजलकार आणि गीतकार आहेत. मराठी कविता Social Media च्या पटलावर आणण्यास त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सध्या "मध्यांतर" हा समकालीन कवितेला पहिला सोलो कार्यक्रम ते करतात. "मध्यांतर" हा कार्यक्रम दिवसेंदिवस तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. हे प्रयोग "बालगंधर्व रंगमंदिर" सारख्या ऐतिहासिक सभागृहात करून मराठी कवितेच्या कार्यक्रमांना व्यावसायिक यश मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. सोबतच गीतकार म्हणून सुद्धा ते प्रसिद्धीस येत आहे. त्यानी लिहिलेलं "बोभाटा" आणि "सखा पांडुरंग" आणि “एक चांदण्याची रात” ही गाणी प्रसिद्ध आहेत. यांचा "एक कविता down" हा मराठी भाषेतला पाहिला OTT Show सुध्दा प्लॅनेट मराठी वर प्रदर्शित झाला आहे. "Social Media" वर तसेच ABP माझा , अमुक-तमुक , व्हायफळ यासारख्या नावाजलेल्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म वर सातत्याने मराठी भाषा, मराठी कविता यांविषयी मांडलेल्या त्यांच्या भूमिका सुध्दा तरूणाई मध्ये चर्चेचा विषय असतो. शेकडो वक्तृत्व, वादविवाद आणि काव्यवाचन स्पर्धा ते स्वतःचा सोलो प्रयोग आणि मिडिया Platform's हा आजवरचा प्रवास प्रेरणा देणारा आहे.
Author: Apurv Rajput | Publisher: New Era Publishing House | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 104