आपण सगळे पुस्तक वाचलो. मित्रवर्य नीतिन वैद्य पुरतकं जगतात. वैद्य पुस्तकं अंधरतात, पांघरतात; पुस्तकांना न्हाऊ-माखू घालतात, अंगडे-टोपडं चढवतात. से पुस्तकांशी बोलतात, पुस्तकांचं
ऐकतात-ऐकवतात. या तीव्र, उत्कट ओढीतून ‘वाचनप्रसंग’ लिहिलं गेलंय.
वेळोवेळी वाचलेल्या पुस्तकांवर लिहिलेली रसाळ, मर्मग्राही टिपणं, असा ‘वाचनप्रसंग’चा बाज आहे. पुस्तकाची थोडक्यात माहिती देऊन वैद्यांचं भागत नाही: पुस्तकाच्या निरनिराळ्या असोसिएशन्सविषयी ते सहज लिहून जातात. चिमूटभर मागचं पुढचं सांगतात. ठिपके ठिपके जोडतात आणि वाचनातलं सुजन वेचतात. मध्येच एखादी सुरेख आठवण कडाडून जाते; एखादं सूक्ष्म निरीक्षण किंवा अभिप्राय–आणि पुस्तकातला गर्भगूढ काळोख लकन् उजळूननिघतो. हे ‘वाचनप्रसंग’चं यश आहे.
Author: Nitin Vaidya | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 216