शंकर : जन्म ७ डिसेंबर १९३३. ‘पथेर पांचाली’च्या प्रदेशांत वनग्रामी, त्या काळच्या यशोहर जिल्ह्यात. वडील हरिपद मुखोपाध्याय, पेशाने वकील, दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच कोलकात्याला निघून आले. लेखक तिथेच लहानाचे मोठे झाले, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोलकात्यातच झाल साहित्यसाधनेची सुरुवातही याच ठिकाणी झाली. साहित्यजीवनाचे प्रायोजक, परिचालक आणि सूरकार शंकरीप्रसाद बसू यांच्याशी परिचय झाला हावड्यालाच.
मधल्या काळात सुरेंद्रनाथ कॉलेजमधून आय. ए. पास करून रात्रीच्या कॉलेजमधून बी.ए. डिग्री संपादन केली. पाच वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांनंतर ‘चौरंगी’ या कादंबरीची निर्मिती. ही कादंबरी देश या पाक्षिकात १९६१ सालापासून धारावाहिक स्वरूपात प्रकाशित झाली. १० जून १९६२ला डेज पब्लिशर्सतर्फे ही कादंबरी पुस्तकरूपात प्रकाशित झाली. आजपर्यंत या कादंबरीच्या एकशेवीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी अनेक विषयांवर कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अलीकडे रामकृष्ण-विवेकानंद या गुरु-शिष्यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांपैकी हे महत्त्वाचं आणि वाचनीय पुस्तक.
Author: Shankar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 346